Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही सिक्स पॅक ॲब्स केले असतील"; फोटो शेअर करत आव्हाडांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:33 IST

आमदार आव्हाड यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाचा कर्जतमधील मेळावा उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गाजवला. येथील सभेत भाषण करताना अजित पवारांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, अनेक गौप्यस्फोट करत शरद पवार हेही भाजपासोबत जाण्यास उत्सुक होते, त्यांच्या सांगण्यावरुन काही गोष्टी आपण केल्याचंही त्यांनी म्हटलं. तर, शरद पवार यांनी दुसऱ्यांदा पावसात भिजल्यावरुन टीकास्त्र सोडताना आमदार जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं होतं. आता, आमदार आव्हाड यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. 

वरिष्ठ पावसात भिजले म्हणून एक जण भिजायला गेला. पांढरा शर्ट, ढेरी बाहेर.. असे म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रका परिषदेत प्रत्युत्तर दिलं होतं. तुमच्याकडे सगळेच पैलवान आहेत का? असा प्रतिसवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केला होता. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा वाढत्या ढेरीवरुन आव्हाड यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. तसेच, त्यांचा ढेरी वाढलेला फोटो शे्र करत जोरदार हल्लाबोलही केला. 

दादा, त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की, तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील. पण, हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. हाहाहा.. असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी अजित पवारांचा फोटो शेअर करत एकप्रकारे खिल्लीच उडवली. 

शरद पवारांचा राजीनामा का हवा होता?

दरम्यान, आव्हाड यांनी अजित पवारांच्या मेळाव्यातील भाषणानंतर व पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. तसेच, ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता, अजित पावरांनी शरद पवार यांच्यावर बोलावं हे कलयुग आहे. बोलतांना मर्यादा बाळगा. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता. त्यात शरद पवार त्यांना अडसर ठरत होते, असा आरोपही आव्हाडांनी केला होता. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला हवा का होता? असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई