योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:25 IST2018-10-22T20:25:46+5:302018-10-22T20:25:54+5:30

भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती.

Yogi Adityanath welcomed Uddhav Thackeray's visit to Ayodhya | योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

मुंबई/लखनौ - भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राउत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उद्धव  ठाकरे यांच्या अयोध्या भेटीचे स्वागत केले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 



 

Web Title: Yogi Adityanath welcomed Uddhav Thackeray's visit to Ayodhya