यंदा शाळेची घंटा १७ जूनला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:42 AM2019-04-20T05:42:49+5:302019-04-20T05:43:02+5:30

येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले आहे.

This year the school bell on June 17 | यंदा शाळेची घंटा १७ जूनला

यंदा शाळेची घंटा १७ जूनला

Next

मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षासाठी विदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर २६ जूनपासून सुरू होतील. शाळांना दिवाळीची सुट्टी २१ आॅक्टोबरपासून देण्यात यावी, असे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षात सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार संचालनालयाने गुरुवारी सुट्यांचे परिपत्रक जारी केले.
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्या लागू करण्याच्या सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. गणेशोत्सव वा नाताळची सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने ठरवण्यात येईल. शाळांना उन्हाळी अथवा दिवाळी या दीर्घ सुट्यांमधून काही सुट्टी गणपती व नाताळसाठी देता येणार आहे. मात्र शाळा संहितेच्या नियमानुसार सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत; तसेच एकूण कामाचे दिवस २३० इतके होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शासकीय स्तरावरून जाहीर झालेल्या सर्वच सार्वजनिक सुट्या शाळा, ज्युनिअर कॉलेजांनी घेणे बंधनकारक असल्याचेही परित्रकात नमूद आहे. Þ
माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना सुट्यांच्या निश्चितीबाबत संबंधित मुख्याध्यापक आणि संघटनांची बैठक घेऊन सुट्या निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुट्यांचे वेळापत्रक तयार करताना जून ते मे अखेर असे शैक्षणिक वर्ष विचारात घ्यावे, अशाही सूचना दिल्या आहेत.
शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सुट्ट्यांबाबत प्रयोगशाळा साहाय्यक आणि परिचर वगळता इतर शिक्षकेतर कर्मचाºयांना दीर्घ सुट्ट्या लागू असणार नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: This year the school bell on June 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.