Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विचारवंत अन् लेखक डॉ. हरी नरके यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 10:57 IST

डॉ. हरी नरके हे सोशल मीडियावर सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता

मुंबई - लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही राहिले आहेत. 

हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. सोशल मीडियावरही ते सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता. विशेष म्हणजे २० तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एका मुलाखतीसंदर्भातील पोस्ट केली आहे. त्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय महात्मा फुले यांचे मूळ छायाचित्र शोधून प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रमिती ही त्यांची मूलगी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.

टॅग्स :मुंबईमृत्यूहॉस्पिटलसोशल मीडियापुणे