Worli was shaken by the explosion; The woman was injured | वरळीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी

वरळीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी

मुंबई : वरळी, सेंच्युरी बाजार येथील मनिष कर्मिशिअल सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी ८.५० च्या सुमारास २५० लिटर नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुचित कौर ही महिला जखमी झाली असून, त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला आहे.

येथील स्फोट एवढा भयंकर होता की स्फोटातून बाहेर पडलेले अवशेष समोरच्या इमारतीवर जाऊन आदळले. आणि त्या इमारतीसही याचा फटका बसला. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य हाती घेतले होते. शिवाय या घटनेमुळे येथील वाहतूकदेखील काही काळ विस्कळीत झाली होती. दुर्घटनेनंतर येथील परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरु होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Worli was shaken by the explosion; The woman was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.