अति घाई जीव घेई... गडबडीत लोकलमध्ये चढताना महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 09:12 PM2018-07-12T21:12:40+5:302018-07-12T21:13:27+5:30

४० वर्षीय महिलेचा हात सुटून मृत्यू 

The woman died in a hurry ... | अति घाई जीव घेई... गडबडीत लोकलमध्ये चढताना महिलेचा मृत्यू

अति घाई जीव घेई... गडबडीत लोकलमध्ये चढताना महिलेचा मृत्यू

Next

मुंबई - विरारहून सुटलेली चर्चेगट लोकल पकडताना एका ४० वर्षीय महिलेचा हात सुटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोरीवली स्थानकावर घडली आहे. मयत महिलेचे नाव अलका पाठारे असे आहे. विरार चर्चेगट लोकल बोरिवली स्थानकात आल्यानंतर ही महिला गाडी पकडण्यासाठी धावली. महिलेने गाडी पकडली. मात्र, हात सुटून त्या लोकलखाली पडल्या आणि तितक्यातच लोकल सुरु झाली. त्यामुळे लोकलच्या चाकाखाली येऊन त्यांचा  जागीच मृत्यू झाला. मृत महिलेला शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली. मयत महिला बोरिवलीत राहणारी असून ती एका खाजगी बँकेत कामाला होती.

Web Title: The woman died in a hurry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.