Join us

सांगलीच्या जागेवर उद्धवसेनाच लढणार?; महाविकास आघाडीची आज घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 09:09 IST

मुंबईत उद्धवसेनेने सहापैकी चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत जागा वाटपाची घोषणा करण्यासाठी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मंगळवारी होत आहे. यात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे किती आणि कोणत्या जागा हे स्पष्ट होणार आहे. यात प्रामुख्याने सांगली, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागा कुणाला जाणार याबाबत असलेली संदिग्धता दूर होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित राहणार आहेत.  

मुंबईत उद्धवसेनेने सहापैकी चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उरलेल्या दोन जागा मिळाव्या अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र उत्तर मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार आणि पक्षाचे जाळे नसल्याने हा मतदारसंघ उद्धवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. ज्या-ज्या मतदारसंघात तिढा होता तो आता सुटलेला आहे. आमच्यात बिघाडी काही नाही, असे उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले. उलट विरोधी महायुतीचे अद्याप काहीच ठरलेले नाही, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :सांगलीलोकसभा निवडणूक २०२४मुंबईउद्धव ठाकरेशिवसेना