Why BJP for 72 hours, and Shiv Sena for only 24 hours? | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपला ७२ तास, तर शिवसेनेला २४ तासच का?
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपला ७२ तास, तर शिवसेनेला २४ तासच का?

सरकार स्थापन करण्याची तयारी आहे का, हे सांगण्यासाठी भाजपला राज्यपालांनी ७२ तासांचा अवधी दिला. शिवसेनेला मात्र २४ तासांचा अवधी दिला, अशी टीका शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी केला.
ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी जास्त वेळ देणे अपेक्षित होते. अनेक लोकांना एकत्रित करून सरकार स्थापन करण्यास वेळ लागतो. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलायचे, या दृष्टीने ज्यांनी काम केलं, त्यानुसार ही पावले पडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही, याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. युतीमध्ये ठरले, त्याप्रमाणे भाजपने केले असते, तर विरोधी पक्षात बसायला आम्ही तयार आहोत, हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. युतीपूर्वी ठरलेल्या गोष्टींवर चर्चाही न करण्याची भूमिका भाजपने घेतली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ न देणे हा भाजपचा अहंकार आहे, असे राऊत म्हणाले.

Web Title: Why BJP for 72 hours, and Shiv Sena for only 24 hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.