Hindustani Bhau: विद्यार्थी आंदोलनामुळे वादात सापडलेला हिंदुस्थानी भाऊ नेमका आहे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 07:56 IST2022-02-01T07:55:11+5:302022-02-01T07:56:15+5:30
Hindustani Bhau: ६ ऑगस्ट १९८३ रोजी जन्मलेला विकास जयराम फाटक हा हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियात वावरतो. त्याच्या मते भारत वा भारतीय संस्कृतीच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तो आवाज उठवतो.

Hindustani Bhau: विद्यार्थी आंदोलनामुळे वादात सापडलेला हिंदुस्थानी भाऊ नेमका आहे कोण?
- ६ ऑगस्ट १९८३ रोजी जन्मलेला विकास जयराम फाटक हा हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियात वावरतो. त्याच्या मते भारत वा भारतीय संस्कृतीच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तो आवाज उठवतो. तो भारत, भारताबाहेरील नेत्यांना अर्वाच्य शिव्या देत असतो. त्याचे फेसबूक, इन्स्ट्राग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
- आतापर्यंत तो कितीही बरळला तरीही त्याच्यावर कारवाई झालेली नाही, त्यातून त्याची हिंमत वाढली. इन्स्ट्रागाम, फेसबुकवरील व्हिडिओंमध्ये त्याने अत्यंत अश्लील भाषा वापरली आहे. अंगावर सोन्याचे दागिने घालून संजय दत्तच्या आवेशात बोलणे ही त्याची स्टाइल आहे.
- बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही तो सहभागी झाला होता. पाकिस्तान, दहशतवाद्यांना शिवराळ बोलून तो प्रसिद्धी मिळवत आहे.
मी कुठल्या पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेलो नाही. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. विद्यार्थी तणावात आहेत. याबाबतचे संदेश मला येत होते. मी फक्त त्यांचा आवाज बनून सोबत उभे राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला. हजारो विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले. माझ्या मुलांनी कुणाला त्रास दिला नाही.
- विकास फाटक