Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जिथं निवडणुका येतात, तिथं मोदीसाहेब जातात', भास्कर जाधवांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:26 IST

'जी कामं शिवसेनेनं केली, त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी करीत आहेत.'

मुंबईःपंतप्रधान नरेंद्र मोदीमुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यामध्ये पीएम मोदी विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी भाजपसह शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. पण, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आखण्यात आल्याची टीका ठाकरे गटाकडून होत आहे. ठाकरे गटातील नेते आ. भास्कर जाधव यांनी यावरुन खोचक टोला लगावला आहे. 

भाजपवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, 'मुंबईमध्ये मोदीसाहेब येत आहेत म्हणजे आपण समजलं पाहिजे की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात होती मात्र त्यावेळी नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत. भारतीय जनता पार्टी ही वाचाळवीरांची पार्टी आहे,' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच, शिवसेनेनं जी काम केली, त्यांचाच उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करण्यची मोदींची खासियत आहे. पण, मुंबईची जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मुंबईची जनता यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. ही जनता मुंबई महानगरपालिका पुन्हा शिवसेनेच्याच ताब्यात देणार,' असंही भाजस्कर जाधव म्हणाले. 

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईभाजपाभास्कर जाधव