'मुख्यमंत्री माझी शाळा'चे ११ लाखांचे बक्षीस कधी? पालिका प्रशासनाची नवी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:06 IST2025-12-15T13:06:21+5:302025-12-15T13:06:45+5:30

प्रशासनाने पारितोषिकाची रक्कम शाळेला मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया प्रभावित होत असल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

When will the prize of Rs 11 lakh be given to 'Chief Minister's My School'? New condition of the municipal administration | 'मुख्यमंत्री माझी शाळा'चे ११ लाखांचे बक्षीस कधी? पालिका प्रशासनाची नवी अट

'मुख्यमंत्री माझी शाळा'चे ११ लाखांचे बक्षीस कधी? पालिका प्रशासनाची नवी अट

घनःश्याम सोनार 
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेच्या कुलाबा उच्च प्राथमिक इंग्रजी शाळेला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेअंतर्गत ११ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. मात्र, शाळेला पारितोषिक धनादेश मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे; तर तांत्रिक कारणामुळे विलंब स्पष्टोक्ती झाल्याची पालिका दिली आहे. 

प्रशासनाने पारितोषिकाची रक्कम शाळेला मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया प्रभावित होत असल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

शाळेने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगूनही निधी वितरित न झाल्याचे आरटीईअंतर्गत कुलाबा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार सुरेश राठोड यांनी 'लोकमत'ला सांगितले.

सुविधा राज्यातील शाळांची पायाभूत सुधारण्यासाठी सुरू असलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत इमारत दुरुस्ती, वर्गखोली सुशोभीकरण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, फर्निचर, डिजिटल साधनसामग्री शाळेला उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रमाणपत्र द्या, मग निधी देऊ

पालिका सर्व शिक्षा अभियान विभागात शाळेने १३ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सल चेक जमा केला तरी निधी मिळाला नाही.

१४ नोव्हेंबरला सर्व शिक्षा अभियान विभागाच्या उपशिक्षणाधिकारी यांनी उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे, मग निधी देऊ अशी सूचना केली; पण शासन निर्णयात अशी अट नसल्याचे शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य यांनी सांगितले.

"शासनाच्या नियमानुसार कुलाबा इंग्लिश स्कूल शाळेला पारितोषिक मिळाले. अद्याप धनादेशाची रक्कम शाळेच्या बँक खात्यावर जमा झाली नाही."
- आरिफ शेख, मुख्याध्यापक, कुलाबा मनपा इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा

"कुलाबा प्राथमिक इंग्रजी शाळेची इमारत ही धोकादायक ठरवल्यामुळे शाळा इमारतीची जागा बदलली. शाळा आता कुलाबा मार्केट पालिकेच्या इमारतीत भरते. या तांत्रिक मुद्द्यामुळे काही काळ लागला. शाळेच्या बँक खात्यावर लवकरच पारितोषिकाची रक्कम जमा केली जाईल."
- सुजाता खरे, शिक्षणाधिकारी, महापालिका

Web Title : 'मुख्यमंत्री माझी शाळा' का 11 लाख का पुरस्कार कब मिलेगा?

Web Summary : कुलाबा स्कूल को 'मुख्यमंत्री माझी शाळा' का ₹11 लाख का पुरस्कार मिलना बाकी है। भवन स्थानांतरण के कारण देरी। बीएमसी का कहना है कि प्रमाणन के बाद जल्द ही धन जमा किया जाएगा।

Web Title : When Will 'Mukhyamantri Majhi Shala's' ₹1.1 Million Prize Be Given?

Web Summary : Kulaba School awaits ₹1.1 million 'Mukhyamantri Majhi Shala' prize. Delay is due to building relocation. Funds soon deposited after certification, says BMC.