When the exhausted police father comes home ..., the feelings of the children are expressed in a poem by the police wife pda | दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून

दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून

ठळक मुद्देघरी पत्नी १० वर्षाची मुलगी सई आणि ५ वर्षाचा मुलगा साईराज असे कुटुंब आहे. त्यांची पत्नी मिरा यांनी मुलांना दमलेल्या पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना कवितेतून मांडली आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून कार्यरत असलेला पोलीस बाबा घरी असला तरी एकटा असतो, त्यात मुलांना जवळ घेण्याचीही भीती. याच पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना पोलीस पत्नीने कवितेतून मांडली आहे.
        

दादर पोलीस कॉलनीत राहणारे शिवराज म्हेत्रे हे डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात  सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेच. घरी पत्नी १० वर्षाची मुलगी सई आणि ५ वर्षाचा मुलगा साईराज असे कुटुंब आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कार्यरत पोलीस विविध प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्ताला तैनात आहे. अशात आपल्यामुळे तो कुटुबियांला कोरोनाची बाधा होवू नये म्हणून स्वतःलाच कुटुबियांपासून लांब करत आहे.
       

त्यांची पत्नी मिरा यांनी मुलांना दमलेल्या पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना कवितेतून मांडली आहे. ही कविता सध्या सर्वत्र शेअर होत आहे. यातच घरी आले तरी मुलांना जवळ घेत नाही, कोरोना असेपर्यत लांब रहा असे सांगतो.  यात, 'दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो, लगेच आम्ही त्याला मिठी मारायला जातो, तो म्हणतो लगेच नका लावू हात जोपर्यंत आहे कोरोनाची साथ" यासह पोलिसाला होणारा, त्रास, काळजी त्याची कर्तव्यनिष्ठा पाहून, पोलिसाची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कवितेतून मांडलेले चित्र सध्या सर्वच पोलिसांच्या घरात आहे.

मुलांची भावना बायकोच्या कुंचल्यातुन

पोलिस बाबाची कहाणी


दमलेला बाबा जेव्हा घरी येतो
लगेच आम्ही त्याला मिठी मारायला जातो

तो म्हणतो लगेच नका लावू हात
जोपर्यंत आहे कोरोनाची साथ

माझा बाबा किती दमून घरी येतो
घरात पण तो एकटा एकटा राहतो
 
सगळ्यांचे बाबा घरी पण माझा बाबा जातो
वर्दीतला माणूस म्हणून काम करत राहतो

त्यालापण वाटते ना रोज रोज भिती
पण लोकांना समजून सांगणार तरी किती

ऊन्हातानात तो रोज करतो काम
त्यालाही येतो ना दमून घाम

ना वेळेवर झोपतो ना वेळेवर जेवतो
ड्यूटी पुढे तो सगळे विसरतो

सारखा असतो त्याच्या मनावर ताण
पण कोणालाच नाही याचे भान

काही न मागताच तो सगळे काही देतो
मनातलं सगळं तो वेळोवेळी जाणून घेतो

मला माझ्या बाबाचा खूप अभिमान वाटतो
खाकी वर्दी घालून जेव्हा थाटात तो चालतो

कितीही संकटे आली तरीही बाबा माझा लढतो
शूरपणा दाखवून तो वेळ प्रत्येक काढतो

देशरक्षणाचा त्याने घेतला आहे वसा
म्हणून लोकांनो थोडे घरात बसा

देवा हे कोरोना संकट लवकर कर दूर
मला बाबाच्या कुशीत झोपायचयं भरपूर

मी माझ्या बाबांची सतत काळजी घेईन
त्याला जे हवं ते सगळे देईन

एकच प्रार्थना करते देवा मी तुला
जन्मोजन्मी वर्दीतल्या पोलिसाची च मुलगी होऊ दे मला
असाच पोलीस बाबा दे मला
@ मिरा शिवराज म्हेत्रे, मुंबई

बलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला 

 

संतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When the exhausted police father comes home ..., the feelings of the children are expressed in a poem by the police wife pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.