लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुंडे, व भाजप आमदार सुरेश धस यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. या घडामोडींमुळे मुंडेंचे काय होणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे मी मुख्यमंत्र्यांकडे दिली. त्यांनी ती सीआयडीला दिली, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.
थोड्याच वेळात मुंडे पडले मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या मुंडे यांनी थोडा वेळ मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. फडणवीसांशी चर्चा करून थोड्याच वेळात ते मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले. माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते.