ट्रेसपासिंग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची युक्ती; रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:18 IST2026-02-08T10:17:30+5:302026-02-08T10:18:29+5:30

लोखंडी कुंपणावर तेल लावण्यास सुरुवात, ट्रेसपार्सिंग करताना अचानक ट्रेन आल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. 

Western Railway trick to prevent trespassing; If you cross the tracks, your hands will be 'black' | ट्रेसपासिंग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची युक्ती; रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे'

ट्रेसपासिंग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची युक्ती; रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे'

मुंबई - रूळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोखी युक्ती शोधली आहे. रेल्वे स्थानकांत दोन रुळांमध्ये बसविलेल्या लोखंडी कुंपणावर तेल (ऑइल) लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हात व कपडे काळे होण्याच्या भीतीने प्रवासी हे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न टाळतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या नेटवर्कवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या थेट रूळ ओलांडण्याचा मार्ग निवडतात. अशा प्रकारे ट्रेसपार्सिंग करताना अचानक ट्रेन आल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. 

सुरक्षित प्रवासासाठी प्रशासन सरसावले
प्रवाशांच्या निष्काळजीमुळे होणारे ट्रेसपासिंग व अपघात कमी करण्याच्या उद्देशाने चर्चगेट ते विरार दरम्यानच्या स्थानकांमधील कुंपणावर तेल लावण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. याशिवाय सीसीटीव्ही देखरेख, विशेष दंडात्मक मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जात असून प्रवाशांनी सुक्षिततेसाठी रूळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कुंपण, पूल, एस्कलेटरची सुविधा
रेल्वे प्रशासनाच्या मते, रूळ ओलांडण्यामुळे होणारे अपघात हे उपनगरी मार्गावरील जीवितहानीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उपनगरी मार्गावर १४७फूट ओव्हरब्रिज, तसेच ११० एस्कलेटर आणि ५४ लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. तरीदेखील काही प्रवासी या सुविधांकडे दुर्लक्ष करून कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात.

Web Title : पश्चिम रेलवे की तरकीब: ट्रैक पार करें, हाथ काले करवाएं!

Web Summary : रेलवे ट्रैक पार करने से रोकने के लिए, पश्चिम रेलवे ने पटरियों के बीच बाड़ पर तेल लगाया। काले हाथ जोखिम भरे क्रॉसिंग को रोक सकते हैं। उपायों में सीसीटीवी, जुर्माना, जागरूकता अभियान शामिल हैं।

Web Title : Western Railway's Oiling Strategy: Cross Tracks, Get Black Hands!

Web Summary : To curb trespassing, Western Railway oils fences between tracks. Black hands might deter risky crossings. Measures include CCTV, fines, awareness campaigns, overbridges, escalators, and lifts for passenger safety.