The Western Expressway is the most polluted in Maharashtra | महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित आहे पश्चिम द्रूतगती मार्ग

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित आहे पश्चिम द्रूतगती मार्ग

मुंबई : कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी मुंबईची जीवनवाहीनी समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसताना मुंबईच्या सर्वच मार्गावर वाहनांची गर्दी झाली असल्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. सध्या पश्चिम द्रूतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाड्यांच्या वर्दळीचा मार्ग असून १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे. परिणामी वायू प्रदूषण वाढत असून, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित मार्ग म्हणून मुंबईतल्या पश्चिम द्रूतगती मार्गाकडे पाहिले जात आहे.

अंधेरी ते दहिसर भागात राहणाऱ्या नागरिकांना या वाढलेल्या वाहतूक कोंडीचा तसेच बदलत्या हवामानाचा त्रास जाणवू लागल्यामुळे  श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडत आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृध्दांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना फुफ्फुस विकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल  म्हणाले, वायू प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो.

----------------------

- कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल श्वासातून तो शोषला जातो.
- त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते.
- ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास वाढतो.
- प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते.
- त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते.

----------------------

- पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूक कोंडीने वायूप्रदूषणाची समस्या चिंतेची ठरली आहे.
- २४ तास वाहतूक सुरू असल्याने वायूप्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे.
- बोरीवली ते वांद्रेपर्यंत जाणारे एस. व्ही. रोड, लिंक रोडवर प्रचंड वाहतुकीमुळे वायू प्रदूषणाची समस्या जास्त आहे.
- बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीसारख्या मोठ्या हरित पट्ट्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.
- मैदानांची कमी झालेली संख्या आणि वाढत्या क्राँकीटीकरणाने हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे. 

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Western Expressway is the most polluted in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.