Join us  

शाब्बास जवाना! तुझ्यामुळेच टळली एअर ऍम्ब्युलन्सची मोठी दुर्घटना; रोख रक्कम बक्षीस जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 8:36 PM

Nagpur Air Ambulance Accident : CISF चे महासंचालक यांनी याची घोषणा ट्वीट करत केली आहे. तसेच सैन्याच्या प्रमुखांनी देखील रविकांत यांचे दाखवलेल्या चतुराईबद्दल कौतुक केले आहे. 

ठळक मुद्देCISF चे जवान रविकांत यांनी दाखवलेली हुशारी नावाजण्याजोगी आहे. त्यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर सुखरूप वाचले.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले. यासंदर्भात चालक दल अनभिज्ञ होते. मात्र, ज्या CISF च्या जवानाने आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने ही घटना पाहून सतर्क केल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. त्यामुळे एएसजी नागपूरचे पोलीस हवालदार रवीकांत आवला यांना दहा हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र जाहीर करून गौरविण्यात आले आहे. CISF चे महासंचालक यांनी याची घोषणा ट्वीट करत केली आहे. तसेच सैन्याच्या प्रमुखांनी देखील रविकांत यांचे दाखवलेल्या चतुराईबद्दल कौतुक केले आहे. 

रविकांत या जवानाच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे मोठी होणारी दुर्घटना टाळली आणि विमानाचे नागपूर विमानतळाने या घटनेची माहिती वैमानिकाला दिली होती. त्यानंतर हे विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. चाक का पडले, याचे कारण समजू शकले नाही. मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी हे विमान दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. तसेच CISF चे जवान रविकांत यांनी दाखवलेली हुशारी नावाजण्याजोगी आहे. त्यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर सुखरूप वाचले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवलदार रवीकांता आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रवीकुमार जी. यांना ॲम्बुलन्स चे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रविकुमार यांनी तात्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी सोबत संपर्क साधला. खबरदारी घेतली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला आणि त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली.

येथील एअरपोर्ट वरून इंधन भरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक एक चाक निखळून पडले. या घडामोडी पासून विमानाचे चालक दल अनभिज्ञ होते. मात्र,  सीआयएसएफचे हवालदार रवीकांत आवला यांनी तात्काळ आपले डेप्युटी कमांडंट रवीकुमार यांना ही माहिती कळविली. त्यानंतर ही माहिती वैमानिकाला देण्यात आली. मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टवर माहिती देऊन इमर्जन्सी लँडिंगची तयारी ठेवण्याची सूचना करण्यात आली. योग्य आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज विशद करून नागपूरची यंत्रणा तबबल चार तास सलग मुंबई एअरपोर्टशी संपर्कात होते. त्याचमुळे  वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. एक अत्यंत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सीआयएसएफचे जवान रविकांत यांनी दाखवलेली सतर्कता लक्षात घेऊन सीआयएसएफ च्या महासंचालकांनी रविकांत यांना  आज १० हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र जाहीर करून गौरविले. सीआयएसएफ महासंचालकांनी तशी घोषणा ट्वीट करत केली. सैन्याच्या प्रमुखांनी देखील रविकांत यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.  या संबंधाने नागपूर एअरपोर्ट सीआयएसएफ युनिटचे डेप्युटी कमांडंट रवी कुमार यांनीही रविकांत यांचे कौतुक करून आज त्यांचा यथोचित गौरव केला.ही सतर्कता प्रेरणादायी

रविकांत यांच्या सतर्कतेमुळे विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर बचावले. त्यांची सतर्कता सुरक्षा यंत्रणेतील प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे, असे रविकुमार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. 

गुरुवारी दुपारी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून मुंबईकरिता जेट सर्व्हिसेस प्रा.लि.च्या सी९० अ‍ॅम्ब्युलन्स विमानाने रुग्णाला घेतले होते. विमानात त्याच्यासह पॅरामेडिकल स्टाफ, एक डॉक्टर व विमानाचे दोन वैमानिक होते. सायंकाळी ५.०५ वाजता इंधन भरण्यासाठी विमान नागपूर विमानतळावर उतरले होते. इंधन भरल्यानंतर मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर विमानाचे एक चाक धावपट्टीवर पडले. तोपर्यंत विमान आकाशात झेपावले होते. या घटनेची सूचना नागपूर विमानतळाने वैमानिकाला दिली. त्याचवेळी वैमानिकाने मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. स्थिती अत्यंत गंभीर होती. वैमानिकाने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेली लँडिंगची परवानगी मागितली. धावपट्टीवर आवश्यक उपाययोजना केल्यानंतर विमान उतरविण्यास परवानगी देण्यात आली. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता उतरविण्यात आले.

 

टॅग्स :पोलिससैनिकनागपूरवैमानिकअपघात