Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 11:55 IST

खासदार संजय राऊत यांनी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

Sanjay Raut ( Marathi News ) : मुंबई-  'हे सरकार चोरांची टोळी चालवत आहे, रोज गुंडाबरोबर बैठका सुरू आहेत. आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले त्यांची लेखक, अभिनेते भेट होत होती. पण आताचे मुख्यमंत्री गुंडांची भेट घेत आहेत. जे तुरुंगात असायला पाहिजेत ते आता मुख्यमंत्र्यासोबत दिसत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

"काल ज्या गुंडांनी पुण्यात निखील वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड का घेतली नाही. ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते, काही दिवसापूर्वी पोलिसांनी पुण्यात गुंडांची परेड घेतली. तशी कालच्या गुंडांची परेड का काढली नाही. या राजकीय गुंडांची परेड काढली पाहिजे, तर पोलिसांनी काढली नाही तर ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, असंही राऊत म्हणाले. 

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राज्य सांभाळणे कठीण झाले आहे. करमचंद जासुसने एकेकाळी कूप चांगले काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी करमचंदांचा अभ्यास करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. इतिहास पाहिला पाहिजे,  रोज चार गुंडांना सोबत घेऊन हे होतं नाही. 

संजय राऊतांनी फोटो पुन्हा ट्विट केला

"आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. आतापर्यंत राऊतांनी सात फोटो ट्विट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी. टीम मिंधे चे खास मेंबर. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य, असा टोलाही लगावला आहे. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदे