Join us

जसे ते मदत करतील तशी आम्ही त्यांना मदत करू; पंकजा मुंडेंचे धनंजय यांच्याबाबत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 06:21 IST

धनंजय मुंडे आणि त्यांचा पक्ष सोबत असल्याने अधिक मतांनी निवडून येईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडे मला जशी मदत करतील तशीच मदत मी त्यांना सहा महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत करेन, असे सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत केले. त्याचवेळी धनंजय मुंडे आणि त्यांचा पक्ष सोबत असल्याने मी अधिक मतांनी निवडून येईल, असे त्या पत्र परिषदेत म्हणाल्या. 

बंधू धनंजय आणि माझ्यात आता नियमित संवाद आहे. भाजपची राष्ट्रवादीशी युती झाल्यानंतर माझ्या राजकीय भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती, पण आता लोकसभेची संधी मिळालेली आहे, असेही पंकजा म्हणाल्या.

धनंजय मुंडे भाजप सोडून गेल्यानंतरची प्रत्येक निवडणूक आम्ही त्यांच्या पक्षाच्या विरोधात लढलो. यावेळी आम्ही सोबत राहू, त्यामुळे मला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. - पंकजा मुंडे

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४पंकजा मुंडेधनंजय मुंडे