Uddhav Thackeray ( Marathi News ) : 'काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द बघूया. तुमची तयारी बघूया, ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या निवडणुका एकट लढण्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरे आज अंधेरी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी हे संकेत दिले.
“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?
राज्यातील महापालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होऊ शकतात. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी या निवडणुका महाविकास आघाडीमधून न लढता. वेगळी लढवण्यात चर्चा करत आहेत. यावर आज उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह उद्या परत येताय त्यांचा समाचार तर घेणार आहे. मी सोडणार नाही. पाठीत वार केला की वाघ नखं आम्ही काढू, मिठी मारली तर प्रेमाने मारु मगाबाजी केली तर वाघनखं काढू. १९७८ साली पुलोदच्या दगाबाजीमध्ये भाजपा सुद्धा होती. दगाबाजीचे बीजे तुमच्यामध्ये आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.
ठाकरे म्हणाले, आज आपण उपनगरात सभा घेत आहे. अडचणीची जागा आहे. वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली सभा झाल्यानंतर ते चिरकतील. तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध हे गद्दार करत आहेत. गद्दारांना जिंकवणारे अमित शाह आहेत. महापालिकेच्या निवडणुका होऊद्यात. मग यांची काय विल्हेवाट होते बघा, आता बसा नाहीतर गावात जाऊन रुसुन बसा, अशा टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी केली.