'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 11:37 IST2022-08-24T11:36:57+5:302022-08-24T11:37:05+5:30

कुणी अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला. 

We did the pushing, not them; We are not afraid, said that ShivSena MLA Bharat Gogawle | 'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा 

'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा 

मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला.

विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दीक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं. 

सदर प्रकरणानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. मात्र कुणी अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला. 

महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले. आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असतं, असा सवाल भरत गोगावले यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. माध्यमांनी तुम्हाला विरोधकांनी धक्काबुक्की केली, असा प्रश्न विचारताच अरे हट्ट...त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणारे नाही, असंही भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. 
 

Web Title: We did the pushing, not them; We are not afraid, said that ShivSena MLA Bharat Gogawle