१८, १९ मे रोजी मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:25 PM2022-05-11T15:25:17+5:302022-05-11T15:26:03+5:30

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन.

Water supply will be closed on 18th and 19th May in these parts of Mumbai | १८, १९ मे रोजी मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

१८, १९ मे रोजी मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

Next

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये ‘एन’ विभागातील सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे Phase-I चे काम बुधवार, दिनांक १८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दिनांक १९ मे २०२२ सकाळी १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. 

सदर कालावधीत म्हणजेच बुधवार, दिनांक १८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दिनांक १९ मे २०२२ सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. 

त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे

१) ‘एल पूर्व’ विभागः राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग - (पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० व रात्री ९.०० ते मध्यरात्री ३.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

२) ‘एन’ विभागः राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता - (मध्यरात्री ३.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

३) ‘एम पश्चिम’ विभागः टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ - (पहाटे ५.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

४) ‘एफ उत्तर’ विभागः वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो - (पहाटे ४.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

५) ‘एफ दक्षिण’ विभागः शहर उत्तर - दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता - (सकाळी ७.०० ते १०.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).

शहर दक्षिण – परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली - (पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).

दरम्यान, पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

Web Title: Water supply will be closed on 18th and 19th May in these parts of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.