Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:14 IST2025-02-01T11:08:07+5:302025-02-01T11:14:30+5:30

Water Cut in Mumbai: मुंबईतील काही भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकारांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

Water supply to be affected for 30 hours in parts of Mumbai on Feb 5 and 6 says BMC | Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

मुंबई

मुंबईतील काही भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकारांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. जलवाहिनीच्या कामासाठी ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत भांडूप परिसर, कुर्ला, अंधेरी, सांताक्रूझ पूर्व आणि धारावी येथील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदादरम्यान नवीन २,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १,८०० मि.मी. व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशत: खंडित करुन नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा बंद राहणार आहे. 

पालिकेच्या या कामामुळे मुंबईतील एस वॉर्ड, के-पूर्व, एच-पूर्व आणि जी-दक्षिण विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यात भांडूप, कुर्ला, धारावी, मरोळ आणि वांद्रे पूर्व परिसराचा समावेश आहे. मनपाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, गढूळ पाण्याचा तात्पुरता पुरवठा होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षिततेसाठी ते पाणी वापरण्यापूर्वी फिल्टर करावे आणि उकळून घ्यावे अशी शिफारस केली जात आहे. 

या विभागात पाणीपुरवठा बंद-

१) एस विभाग : श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर. नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर. सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी. तुळशेतपाडा, टेंभीपाडा, नरदास नगर, रमाबाई नगर १ आणि २, साई हिल भांडुप  जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एस विभाग : क्वारी मार्ग, प्रताप नगर मार्ग, जंगल मंगल मार्ग, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदीर मार्ग, लेक मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदान जवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, रामनगर उदंचन केंद्र, रावते कंपाऊंड उदंचन केंद्र, हनुमान टेकडी, अशोक टेकडी,  (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

२) एल विभाग : कुर्ला दक्षिण - काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मील मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफुर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एल विभाग : कुर्ला उत्तर – ९० फीट रोड, कुर्ला – अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

३) जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

जी उत्तर विभाग : जस्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फीट मार्ग, ९० फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

४) के पूर्व विभाग : विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी., मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर रोड, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

५) एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एच पूर्व विभाग : ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

Read in English

Web Title: Water supply to be affected for 30 hours in parts of Mumbai on Feb 5 and 6 says BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.