Join us

Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 22:54 IST

Mumbai lake Water Level: मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या १८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मुंबईकरांना पुढील ६० दिवस पाणीपुरवठा करता येईल, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पंरतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के अधिक आहे. मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.

दरम्यान, तानसा, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या प्रमुख पुरवठा तलावांमधील पाण्याची पातळी २० टक्क्यांपेक्षा कमी झाली. बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा येथून १.८१ लाख दशलक्ष लिटरच्या राखीव साठ्यातून पाणी काढण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळवली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, एक टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने ५ जून २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबईपाणीपाणीकपातमहाराष्ट्र