भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:01 AM2024-01-08T07:01:20+5:302024-01-08T07:01:54+5:30

अभिनेता किरण माने ठाकरे गटात

Wanderers will not be taken back home! Uddhav Thackeray targets Shinde group | भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही. खोके घेणारे पक्ष, चिन्ह सगळं घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. उद्धव ठाकरे एकटा नाही. त्याच्यासोबत महाराष्ट्र आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिंदे गटाला लगावला.

ठाकरे गटातही पक्षप्रवेश सुरू असून बीड जिल्ह्यातील गजानन कदम, उल्हासनगरमधील राजेश वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेसारखे प्रेम दुसऱ्या कोणत्याच पक्षात मिळत नाही. लढाई मोठी आहे, पण तुमच्यासारखे कट्टर शिवसैनिक एकवटले; तर ही लढाई सोपी आहे. बीडचे ‘निर्भीड’ शिवसैनिक पक्षात प्रवेश करत आहेत. आज फुटलेल्या पालवीचा उद्या बीडमध्ये महावृक्ष होणार आहे. मी सत्ताधाऱ्यांना आवाहन केले की तुम्ही लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल.

खा. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण या मतदारसंघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. १३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण मतदारसंघात दौरा करणार आहेत. विविध शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार असून यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार असून निवडणुकीविषयी चर्चा केली जाणार आहे.

अभिनेता किरण माने ठाकरे गटात

  • ‘मुलगी झाली हो’ मालिका व ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेले अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला.  
  • मी एक सामान्य कलाकार आणि सर्वसामान्य घरातील माणूस आहे. परिवर्तनाच्या चळवळीत मी कायम असतो आणि राहीन. खूप विचार करून मी ही राजकीय भूमिका घेतली आहे, असे अभिनेता किरण माने यांनी स्पष्ट केले.

Web Title: Wanderers will not be taken back home! Uddhav Thackeray targets Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.