Walmik Karad, Karuna Sharma ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला खंडणी मागीतल्या प्रकरणी वाल्मीक कराड ( Walmik Karad ) याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही कराड याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनीही गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद वाढल्यानंतर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मीक कराड याने आपल्याला चुकीचा स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा ( Karuna Munde ) यांनी केला. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हा आरोप केला.
काल कोर्टाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर माध्यमांसोबत बोलत असताना करुणा शर्मा यांनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केला. करुणा शर्मा म्हणाल्या,बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मीक कराड ( Walmik Karad ) याने माझ्यावर हात उगारला होता. तसेच वाल्मीक कराड याने माझ्या अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केली, असा गंभीर आरोप शर्मा यांनी केला.
"माझ्या पतीसमोर कराड याने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मागणी केली होती. पण मला ते अजूनही मिळालेले नाही, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही शर्मा यांनी केली.
धनंजय मुंडेंना दणका!
करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये, तर त्यांच्या मुलीसाठी ७५ हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश गुरुवारी दिले. तर मुलगा २१ वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला.
‘धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नसल्याचा दावा केला असला, तरी १८ जुलै २०१७ मध्ये केलेल्या वसीहतनाम्यात करुणा शर्मा पहिली पत्नी व राजश्री मुंडे दुसरी पत्नी असल्याचे मान्य केले आहे. तसेच एका स्वीकृतीपत्रात मुंडे यांनी करुणा यांच्याशी ९ जानेवारी १९९८ रोजी विवाह केल्याचे मान्य केले आहे.