नवजात बालकांसाठी वाडिया हितकारक; तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:46 AM2020-01-15T01:46:20+5:302020-01-15T01:46:33+5:30

जन्म देण्यापासून काळजी घेण्यापर्यंतचे उपचार उपलब्ध

Wadia beneficial for infants; Expert opinion | नवजात बालकांसाठी वाडिया हितकारक; तज्ज्ञांचे मत

नवजात बालकांसाठी वाडिया हितकारक; तज्ज्ञांचे मत

Next

मुंबई : मूदतपूर्व होणाऱ्या प्रसूती, नवजात बालकांना होणारा संसर्ग, नवजात बालकांचे वजन कमी अशा लहानग्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी परळचे वाडिया रुग्णालय हितकारक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वाडिया रुग्णालय हे नवजात बालकांसाठी नवसंजीवनी आहे.

वाडिया रुग्णालय वाचविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करण्यात येत आहेत. वाडिया रुग्णालयात १५००हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णालयावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, निवृत्त कर्मचाºयांचे पेन्शनही थांबविण्यात आले आहे. याविषयी वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी रुग्णालयाची अगतिकता स्पष्ट करताना रुग्णालय बंद होऊ शकत नाही, असे सांगितले. रुग्णांप्रति आमचीही जबाबदारी आहे. रुग्णालयाची सद्यस्थिती वाईट आहे. सध्या या बालरुग्णालयातून ३००हून अधिक आणि प्रसूती रुग्णालयातून १००हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. एका आठवड्यात १५० बालरुग्णांना प्रसूतीगृहातून तसेच २००हून अधिक रुग्णांना मागे पाठवले.

मंगळवारी या रुग्णालयातून एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. सर्व स्तरांवर चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा वाडिया रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. वाडिया रुग्णालयाचे दोन भाग आहेत. बाई जेरबाई वाडिया आणि नौरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालय अशा संस्था आहेत. नौरोसजी वाडिया रुग्णालयाचा जवळपास ११० कोटींचा निधी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.

यशला ‘वाडिया’चा आधार
हिंगोली जिल्ह्यातील कांताबाई घरपड यांनी यशला परळ येथील वाडिया बालरुग्णालयात दाखल केले आहे. यशला जन्मापासून चालता-बोलता येत नाही. तो भावनाही व्यक्त करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात घरपड कुटुंबीयांनी उपचारासाठी प्रयत्न केले. मात्र अपयश पदरी पडले. मुंबईतच नातवाचे उपचार होऊ शकतात. या आशेने त्यांनी मुंबईत यशला बालरुग्ण रुग्णालयात दाखल आहे. परळच्या वाडियाचे नाव ऐकून त्या नातवाला घेऊन आल्या. यशवर उपचार सुरू असून डॉक्टरांचेही सहकार्य मिळत असल्याने वाडिया रुग्णालय प्रशासनाचे त्या आभार मानतात.

आशियातील मोठा अतिदक्षता विभाग
बालकांमध्ये आढळणाºया अगदी दुर्मीळ आणि दुर्धर आजारांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. आशियातील सर्वांत मोठा २०० खाटांची क्षमता असलेला बालअतिदक्षता विभाग या रुग्णालयात आहे. याबरोबरच ७५ खाटांचा अतिदक्षता विभाग, सर्वाधिक व्हेंटिलेटर, विविध आजारांवरील सुपरस्पेशालिटी विभाग अशा सेवा-सुविधांनी हे रुग्णालय परिपूर्ण आहे. सयामी जुळ्यांवरील शस्त्रक्रिया, हृदयविकारांची गुंतागुंत, लहानग्यांचे यकृत प्रत्यारोपण या रुग्णालयात सुरू करण्यात आले.

Web Title: Wadia beneficial for infants; Expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.