VISION MBA 2018 : लोकमतकडून एमबीए सीईटी विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 13:38 IST2018-02-23T13:36:46+5:302018-02-23T13:38:05+5:30
एमबीए करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकमतच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आलेला आहे.

VISION MBA 2018 : लोकमतकडून एमबीए सीईटी विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा
मुंबई - एमबीए करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकमतच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आलेला आहे. शहर आणि उपनगरातील विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टीने दादर, ठाणे, बोरिवली आणि वाशी अशा चार ठिकाणी कार्यशाळेचे वर्ग घेण्यात येणार आहेत. दादर येथे 24 फेब्रुवारी रोजी तर ठाणे येथे 25 फेब्रुवारीला कार्यशाळा घेण्यात येईल. बोरिवली येथे 3 मार्च तर वाशी येथे 4 मार्च रोजी ही कार्यशाळा आयोजित होईल.
या कार्यशाळेमध्ये उपस्थित विद्यार्थांना एमएएच सीईटीसाठी पूर्वतयारी आणि गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच करिअर नियोजन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम निवडीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी 022-67887777 या फोननंबरवर किंवा 9820155405/9769222331/9833202390 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी contact@kohinoor.edu.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.