Join us
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी 40 वर्षांत जे कमावले ते घरात ठेवले, म्हणून त्यांचे घर भरलेले; विनोद तावडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 16:45 IST

माझं घर भरलेलं आहे, मोदींचं रिकामं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - माझं घर भरलेलं आहे, मोदींचं रिकामं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी 40 वर्षे सत्तेत राहून जे काही कमावले ते त्यांनी घरात नेऊन ठेवले, त्यामुळे त्यांचं घर भरलेलं आहे, असा टोला विनोद तावडे यांनी लगावला आहे. माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी काल दौड येथे झालेल्या सभेतून लगावला होता. दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या या टीकेला भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले की, माझं घर भरलेलं आहे आणि मोदींचं रिकामं आहे. शरद पवार यांनी 40 वर्षे सत्तेवर राहून स्वत:चे घर भरण्याचेच काम केले. मोदींचं काय आहे. ''मै खाता नही खाने देता नही'' मग त्यांचं घर रिमाकमच असणार,'' असे विनोद तावडे म्हणाले. तसेच मुंबईतील सर्व सहाजागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील, अशे भाकितही तावडे यांनी केले.  

टॅग्स :विनोद तावडेशरद पवारमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019भाजपाराष्ट्रवादी काँग्रेस