Vidhan sabha 2019 : काँग्रेस महाआघाडी प्रचार आजपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:29 IST2019-10-01T06:28:50+5:302019-10-01T06:29:11+5:30
महानगरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस-काँंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईतील प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार आहे.

Vidhan sabha 2019 : काँग्रेस महाआघाडी प्रचार आजपासून
मुंबई : महानगरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस-काँंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईतील प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार आहे. उपनगरातील देवनार येथील डेपोजवळील आंगण सभागृहात सायंकाळी सभा होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात शहर व उपनगरात दोन्ही आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.
राष्टÑवादी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते यांच्याबरोबरची ही दुरंगी लढत जवळपास निश्चित आहे. अस्तित्वहीन राष्टÑवादी कॉँग्रेससाठी मुंबईतील ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी संयुक्त मेळाव्यातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.