Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल; भाजपा, राष्ट्रवादीने दिले डमी उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 14:51 IST

आज विधान भवनात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीशीही चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत भाजपाने ४, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २ तर काँग्रेसने १ उमेदवारी जाहीर केला आहे. ९ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. काँग्रेसने दुसऱ्या जागेचा अट्टाहास सोडल्यानंतर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

आज विधान भवनात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय यासोबत भाजपाने रमेश कराड आणि संदीप लेले असे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने किरण पावस्कर यांची डमी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखली केली असून एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. छाननीनंतर रमेश कराड, संदीप लेले व किरण पावस्कर उमेदवारी अर्ज मागे घेतील त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!

येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

महिलेचा मृतदेह चितेवर ठेऊन पळाले लोक; ‘जे’ घडलं ते पाहून सगळेच झाले अवाक् मग..

“चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी

 

टॅग्स :विधान परिषद निवडणूकउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेना