Video: विश्वास नांगरे- पाटील 'बाला' गाण्यावर थिरकले; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:50 PM2019-12-27T15:50:07+5:302019-12-27T15:55:14+5:30

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी विश्वास नांगरे- पाटील एक होते

Video: Vishwas Nangare Patil Dance on 'Bala' song; Video viral | Video: विश्वास नांगरे- पाटील 'बाला' गाण्यावर थिरकले; व्हिडिओ व्हायरल

Video: विश्वास नांगरे- पाटील 'बाला' गाण्यावर थिरकले; व्हिडिओ व्हायरल

Next

मुंबई: कर्तव्यनिष्ठ आणि पोलीस दलात धडाकेबाज कामगिरी करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे- पाटील अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट हाऊसफुल्ल 4 मधील 'बाला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी विश्वास नांगरे- पाटील एक होते. तसेच तरुणांचे आर्दश म्हणून देखील विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे पाहिले जाते. नवीन विद्यार्थ्यांना यूपीएससी(UPSC) परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. याआधी विश्वास नांगरे- पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक पद त्यांनी भूषविले होते. सध्या त्यांची नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कारभार सांभाळत आहे.

Web Title: Video: Vishwas Nangare Patil Dance on 'Bala' song; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.