Video: Mumbai police receive protection cover, Home Minister distributes 5,000 personal protection kits pda | Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप

Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप

ठळक मुद्देराज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन 16-16 तास कार्यरत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पाच हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे.

मुंबई - कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, शासन त्यांच्या सदैव पाठीशी आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.


            

मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज, उपायुक्त मुख्यालय एन. अंबिका, उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, उपायुक्त (झोन 1) संग्रामसिंह निशानदार, उपायुक्त (झोन 2) राजीव जैन, उपायुक्त (एस.बी. 1) गणेश शिंदे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
           

राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन 16-16 तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्याबाबतच्या सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. हि बाब महत्वपुर्ण व अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास  त्याचा फायदा पोलीसांना आरोग्य सुरक्षा दृष्टिने नक्कीच होईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.
            

कोरोनामुळे जर एखादा पोलीस कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या कुटूंबीयांसाठी शासनाने 50 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. शासन पुर्णपणे पोलीसांच्या पाठीशी उभे आहे, याबद्दल पोलीस आयुक्त परमविरसिंह यांनी शासनाचे व गृहमंत्र्यांचे आभार मानले. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पाच हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्याची प्रातिनिधिक सुरुवात गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Mumbai police receive protection cover, Home Minister distributes 5,000 personal protection kits pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.