Join us

Video : मालाड येथे प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 20:49 IST

Fire : जवळपास ७ ते ८ हजार चौरसफुटाचे तळमजला आणि पहिला मजला असे हे गोडाऊन आहे. 

ठळक मुद्दे आगीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मालाड पूर्व येथे पठाणवाडी परिसरात अंबिका हॉटेलच्या समोर एका प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग जवळपास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लागली आहे. मालाड पूर्व येथील पठाणवाडी परिसरातील त्रिवेणी नगरमध्ये प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला आग लागली आहे. जवळपास ७ ते ८ हजार चौरसफुटाचे तळमजला आणि पहिला मजला असे हे गोडाऊन आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक आणिअग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्लायवूडचे गोडाऊन असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. धुराचे लोट देखील परिसरात पसरले आहे. या भीषण आगीचे व्हिडिओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल देखील मालाडमधील परमार हाऊस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ७ गाड्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

 

 

टॅग्स :आगअग्निशमन दलपोलिसमुंबई