Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर मद्यप्राशन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:18 PM2023-03-14T18:18:30+5:302023-03-14T18:24:07+5:30

Mumbai Local Train : व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण सर्वांसमोर मद्यप्राशन करताना दिसत आहे.

Video : Man drinking alcohol during daytime in Mumbai local train; Demand for action after video goes viral | Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर मद्यप्राशन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर मद्यप्राशन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

googlenewsNext

Drinking Alcohol In Mumbai Local : मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अनेकदा अनेकजण खाताना दिसतात. पण, आता याच लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती सर्वांसमोर मद्यप्राशन करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ तो सर्वांसमोर आरामात मद्यप्राशन करताना दिसत आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक तरुण प्रवासादरम्यान मद्यप्राशन करत होता. यावेळी त्या डब्यात इतर अनेकजण होते, पण त्यांची भीती न बाळगता तो मद्यप्राशन करू लागला. ही लोकल ट्रेन वडाळा रोडवरुन पनवेल स्टेशनच्या दिशेने जात होती. यावेळी डब्यातील इतर कोणीही त्याला अडवले नाही. यातील एकाने गुपचूप त्या तरुणाचा व्हिडिओ शूट केला. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर @s_indicate नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने मुंबई पोलिसांना या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ट्रेनमध्ये कोणालाही सर्वांसमोर दारू पिण्याची परवानगी आहे का? असा सवाल त्यांनी केला.

यापूर्वी जुगाराचा व्हिडिओ व्हायरल झाला
याआधीही मुंबई लोकलमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. ट्रेनच्या डब्यात काही लोक सर्वांसमोर जुगार खेळताना दिसले होते. ते सर्वजण दररोज मुंबई लोकल ट्रेनमध्ये असा प्रकार करतात, अशी माहिती तेव्हा देण्यात आली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Video : Man drinking alcohol during daytime in Mumbai local train; Demand for action after video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.