Video ... त्यामुळे IAS अधिकाऱ्यावर उगारला लॅपटॉप, बच्चू कडूंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:05 AM2018-09-27T10:05:57+5:302018-09-27T10:06:03+5:30

सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षेची तयारी करतात, सरकार जागा कमी जाहीर करते पण लाखो विद्यार्थी परीक्षा शुल्क देतात

Video ... Laptops leaked on IAS officer, disclosure of baby bites | Video ... त्यामुळे IAS अधिकाऱ्यावर उगारला लॅपटॉप, बच्चू कडूंचा खुलासा

Video ... त्यामुळे IAS अधिकाऱ्यावर उगारला लॅपटॉप, बच्चू कडूंचा खुलासा

Next

मुंबई - प्रहार संघटननेचे संस्थापक आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातीत एका आयएएस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. यावेळी संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर लॅपटॉप उचलून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कडूंचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार कडू यांचा हा व्हिडीओ सोशल माडियीवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, आमदार कडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतचा खुलासा दिला आहे. 

सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षेची तयारी करतात, सरकार जागा कमी जाहीर करते पण लाखो विद्यार्थी परीक्षा शुल्क देतात व परीक्षेला बसतात. राज्य सरकारने mpsc मार्फत घेणारी परीक्षा नवीन खाजगी IT कंपनी नेमून घेण्याचे जाहीर केले. या कंपनीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये गोळा केले व सरकारने महापरीक्षा पोर्टल तयार करून महाराष्ट्रात 5-6 परीक्षा घेतल्या या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ व अपारदर्शकता असल्याच्या तक्रारी हजारो विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. पण कोणतीच कारवाई सरकार करत नव्हते. 

आमदार बच्चू कडू यांच्याकडे या विद्यार्थ्यांनी संपर्क करून त्यांच्या वेदना मांडल्या. त्यावेळी आमदार कडू यांनी 22 तारखेस मुख्यमंत्री व अधिकारी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या समस्या कळवल्या. या पत्रावर अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र राज्य माहिती संचालनालय संचालक प्रदीप पी. या अधिकाऱ्याच्या मंत्रालयातील केबिनमधे दाखल झाले. बच्चू कडूंनी शांतपणे विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिकाऱ्यास सांगितले व आपण माझ्या पत्रावर केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती विचारली. या अधिकाऱ्याने तुमच्या पत्रावर मी कनिष्ठ अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे, हे सरकारी उत्तर आले. त्यानंतर बच्चू कडू त्या  अधिकाऱ्यास हा विषय महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी कसा महत्वाचा आहे, हे समजावून सांगत होते. पण अधिकारी न ऐकता हे कशाला माझ्या केबिनमध्ये आले आहेत, असा आव आणत होता. तरीही, पुढील पाच मिनिटे त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यात व तुम्ही कशी तात्काळ संबंधित कंपनीवर कारवाई करू शकतात हे समजावले. पण अधिकाऱ्याचे एकच होते की, मी अहवाल मागवला आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या टेबलवरील लॅपटॉप उचलून अधिकाऱ्याच्या टेबलवर आपटला. त्यानंतर त्याच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, असा खुलासा बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक अंकाऊटवरुन दिला आहे. 

पाहा व्हिडिओ - 


 

Web Title: Video ... Laptops leaked on IAS officer, disclosure of baby bites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.