Video : कांदिवलीत फर्निचर दुकानाचे स्लॅब कोसळले; एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:28 IST2018-12-14T16:31:07+5:302018-12-14T21:28:40+5:30
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

Video : कांदिवलीत फर्निचर दुकानाचे स्लॅब कोसळले; एका महिलेचा मृत्यू
मुंबई - कांदिवली पश्चिम परिसरात बंदर पाखाडी रोडजवळ असलेल्या गुंजन टॉवरसमोर लाकडाच्या फर्निचरचे दुकान आहे. आज दुपारी चारच्या सुमारास या दुकानातील स्लॅब कोसळून अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात सोनम राजनाथ यादव (24) या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.