Join us

Video : अंधेरीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:18 IST

Fire News :अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि १ पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समागे वीरा देसाई रोड येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मंडपाला भीषण आग लागली आहे. ही आज दुपारी ४.३० च्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि १ पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

घटनास्थळी एका दुकानाला आग असल्याचा कॉल अग्निशमन दलाला प्राप्त झाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. आग मोठ्या प्रमाणात लागल्याने काळ्या धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. 

 

 

टॅग्स :आगअग्निशमन दलअंधेरीपोलिस