Join us  

Video : सायन येथे पार्क केलेल्या कारने अचानक घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:41 PM

काही नागरिकांनी घटनास्थळावरून अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच गाडी जळून खाक झाली होती. 

ठळक मुद्देही गाडी सीएनजी वर चालणारी असल्याने गाडीत गॅस ने भरलेला बाटला होता. एका स्थानिकाने काढलेल्या व्हिडिओमध्ये या गॅसच्या बाटल्यामधून गॅस संपूर्णपणे बाहेर येताना दिसत होते.यामुळे चालकाने ही गाडी सायन रुग्णालयाच्या नजीक असणाऱ्या मार्ग क्रमांक १६ येथे रस्त्याच्या कडेला लावली. काही वेळाने गाडीने अचानक मोठा पेट घेतला. सुदैवाने यात यात कोणालाही इजा झाली नाही.

मुंबई : सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालयाजवळ (सायन रुग्णालय) पार्क करण्यात आलेल्या चारचाकी गाडीने दुपारी अचानक पेट घेतला. गाडीला अचानक लागलेल्या आगीमुळे स्थानिक रहिवासी व पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही स्थानिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. काही नागरिकांनी घटनास्थळावरून अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच गाडी जळून खाक झाली होती.

ही गाडी सीएनजी वर चालणारी असल्याने गाडीत गॅस ने भरलेला बाटला होता. एका स्थानिकाने काढलेल्या व्हिडिओमध्ये या गॅसच्या बाटल्यामधून गॅस संपूर्णपणे बाहेर येताना दिसत होते. सुदैवाने यावेळी सर्व नागरिक गाडीपासून दूर उभे होते यामुळे कोणालाही इजा नाही. गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की जवळच असलेल्या झाडाच्या फांद्या देखील जळून खाक झाल्या.

यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व गाडीला लागलेली आग त्यांनी विझवली. मात्र या आगीत ही गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दुपारी साडे तीनच्या सुमारास एमएच ३९ एफ ९५७९ या गाडीचे इंजिन अतिशय गरम झाल्याने त्यामधून धूर निघू लागला होता. यामुळे चालकाने ही गाडी सायन रुग्णालयाच्या नजीक असणाऱ्या मार्ग क्रमांक १६ येथे रस्त्याच्या कडेला लावली. काही वेळाने गाडीने अचानक मोठा पेट घेतला. सुदैवाने यात यात कोणालाही इजा झाली नाही.

 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी

टॅग्स :आगमुंबईपोलिसकार