'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:30 AM2023-08-11T05:30:18+5:302023-08-11T05:30:39+5:30

उपमुख्यमंत्र्यांचा फॉक्सकॉनबद्दल विश्वास

Vedanta Foxconn Company has to come back to Maharashtra one day or the other - Devendra Fadanvis | 'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुंतवणूक खेचून आणण्याची अपार क्षमता महाराष्ट्राकडे आहे आणि वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एका प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. 

वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातून का गेली, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात धोरण लकव्यासारखी स्थिती होती. निर्णयच होत नव्हते. प्रगत राज्य थांबले होते. राज्य सरकारच्या गुंतवणूक समितीची बैठक १८ महिने झालीच नाही, अशी परिस्थिती होती. 
पुण्याजवळील तळेगाव येथे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येणार होता.पण गेल्यावर्षी हा प्रकल्प गुजरातला गेला. नंतर फॉक्सकॉनने प्रकल्पातून माघार घेतली असली तरी आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू, असे वेदांता कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. 

आर्थिक दुर्बलांसाठी १५० कोटी ‘अमृत’ला अखेर सरकारी आधार
मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि  प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत (अमृत) शैक्षणिक योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण तसेच  नोकरी इच्छुक युवकांसाठी यूपीएससी आणि  एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यावर्षी १५० कोटी रुपये देणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजना याबाबत  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. 

Web Title: Vedanta Foxconn Company has to come back to Maharashtra one day or the other - Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.