मुंबई विद्यापीठ : पास होऊनही इंटर्नशिपमध्ये अडथळे, गुणपत्रिका न मिळाल्याने विधिचे विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:24 AM2018-02-12T03:24:04+5:302018-02-12T03:24:18+5:30

मुंबई विद्यापीठातून विधि अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. मूळ निकालात नापास झालेले अनेक विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनाच्या निकालात पास झाले

 University of Mumbai: Despite obstacles in internships, and absence of a mark sheet, the law students suffer | मुंबई विद्यापीठ : पास होऊनही इंटर्नशिपमध्ये अडथळे, गुणपत्रिका न मिळाल्याने विधिचे विद्यार्थी त्रस्त

मुंबई विद्यापीठ : पास होऊनही इंटर्नशिपमध्ये अडथळे, गुणपत्रिका न मिळाल्याने विधिचे विद्यार्थी त्रस्त

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठातून विधि अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. मूळ निकालात नापास झालेले अनेक विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनाच्या निकालात पास झाले. पण, हातात गुणपत्रिका नसल्याने इंटर्नशिपचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या आॅनलाइन पेपर तपासणीवेळी विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीला प्राध्यापक मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे विधि अभ्यासक्रमाच्या निकालात चुका झाल्या होत्या. हे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी दिल्या. या निकालात विद्यार्थी पास झाले आहेत. पण, त्यांना सुधारित गुणपत्रिका विद्यापीठाने अजूनही दिलेल्या नाहीत.
काही विद्यार्थ्यांना नामांकित फर्म अथवा वकिलांकडे इंटर्नशिपची संधी मिळाली होती. पण, या विद्यार्थ्यांना नियमानुसार, गुणपत्रिका देण्याची मुदत देण्यात आली. मुदत संपली तरी विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आता इंटर्नशिप करायला मिळणार की नाही, या विचाराने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या नोकºयांवर गदा आलेली आहे. पण, परीक्षा विभागाकडून याबाबत विद्यार्थ्यांना कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका न मिळाल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे मत स्टुंडट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त
केले.

Web Title:  University of Mumbai: Despite obstacles in internships, and absence of a mark sheet, the law students suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.