मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:45 AM2022-07-27T08:45:03+5:302022-07-27T08:46:16+5:30

भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री  फडणवीस आणि शिंदेंचे आमदार शिंदेंकडे जाऊन आपल्याला संधी मिळणार का

Uneasiness spread among the aspirants as the cabinet was not being expanded by Eknath Shinde | मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आधी सत्तांतर नाट्यामुळे सरकारी कामकाजात आलेली शिथिलता आणि आता ३० जूनपासून दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याचा मंत्रालयातील कामकाजावर परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. इच्छुक आमदारांमध्येही अस्वस्थता आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे वाटपदेखील झालेले नाही. अशा परिस्थितीत सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे मानले जाते. राज्यात एकीकडे पूरपरिस्थिती असताना पालकमंत्रीच नसल्याने अडचणी येत आहेत. विकासकामांनाही खीळ बसली आहे. महत्त्वाचे निर्णय अडले आहेत. शिंदे-फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला असला तरी सर्वच विषयांवरील बैठका घेणे त्यांनाही शक्य नाही. त्यागाची तयारी ठेवा, असे फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले, सर्वांचेच समाधान करणे शक्य नाही असेही ते म्हणाल्याने भाजपमधील इच्छुक धास्तावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात आधीच्या सरकारमध्ये ९ मंत्री होते. त्यांना पुन्हा संधी दिली तर आमचे काय होईल, अशी भीती इतर इच्छुकांच्या मनात दाटली आहे. भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री  फडणवीस आणि शिंदेंचे आमदार शिंदेंकडे जाऊन आपल्याला संधी मिळणार का, याची चाचपणी करतात. काळजी करू नका असे दोन्ही नेते आपापल्या आमदारांना सांगत आहेत.

nशिंदे, फडणवीस यांना एकट्यात भेटण्याची संधी अनेक आमदार शोधतात; पण दोघांभोवतीही गर्दी असते आणि गर्दी नसेल तेव्हा काही आमदारांनी सतत त्यांना घेरलेले असते. त्यामुळे आम्हाला मनातले बोलताही येत नाही, अशी काही आमदारांची तक्रार आहे.
nराष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात आणि पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात या पक्षाचेही काही आमदार मंत्री म्हणून दिसतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Web Title: Uneasiness spread among the aspirants as the cabinet was not being expanded by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.