अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 09:36 AM2024-01-07T09:36:26+5:302024-01-07T09:36:44+5:30

अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नसल्याचे ठाकरेंकडून स्पष्ट

Uddhav Thackeray will not go to Ayodhya; Pooja, Mahaarti will be performed at Kalaram Temple in Nashik | अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नाशिक: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी ते नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासह गोदावरी तीरावर महाआरती करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. अयोध्याला जाण्यासाठी मला निमंत्रणाची गरज नाही. कारण श्रीराम हे सर्वांचेच आहे. राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. श्रीरामावरून आता राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. 

Web Title: Uddhav Thackeray will not go to Ayodhya; Pooja, Mahaarti will be performed at Kalaram Temple in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.