Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तोवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येणार नाही; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 22:43 IST

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे वेगळ्या विचारधारेचे पक्ष आहे.

मुंबई: काँग्रेस व राष्ट्रवादीला काही मुद्दयांवर स्पष्टता हवी, तशीच शिवसेनेलाही हवी आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत काही मुद्यांवर स्पष्टता झाल्याशिवाय एकत्र येणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वेगळ्या विचारधारेचे पक्ष आहे. त्यामुळे हे पक्ष एकत्र कसे येणार हा सर्वांना पडलेला पक्ष आहे. मात्र लकरच या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. तसेच राज्याचं राजकारण नव्या दिशेने जाऊ शकत असेल तर त्याची सुरुवात होत असल्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणं म्हणजे पोरखेळ नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं!

शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.  

 भाजपा-शिवसेनेत अजूनही फोनाफोनी सुरूच?; उद्धव ठाकरेंनी सांगितले हळूच

विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशरद पवार