“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:14 IST2025-09-27T16:09:55+5:302025-09-27T16:14:24+5:30
Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो किंवा मग राज्य सरकार असो. प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही. याचे कारण असे की, मी अजूनही यात राजकारण आणू इच्छित नाही. परंतु, ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने कोरोना काळात मृतदेह गंगेत प्रवाहित केले, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या. मुख्यमंत्र्यांना माझे जाहीर आव्हान आहे की, जशी मुख्यमंत्री मदत निधीची तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रशासन आणि भाजपाचा काहीही संबंध नाही. कोरोना काळात महाराष्ट्रात जेवढी कोव्हिड सेंटर उभारली गेली, ती कशी उभारली गेली. लसीकरण केंद्र जी एक ते दोन होती, ती आम्ही ६०० वर केली. रुग्णशय्या वाढवल्या, ऑक्सिजनचे प्लांट टाकले, हे सगळे आम्ही त्यावेळी केले. पण याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती, हे ते विसरत आहेत. पंतप्रधानांनी रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या. त्यावेळी आम्ही जनतेला पाच रुपयांत शिवभोजन दिले होते. हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. या सगळ्या विषयावर आपण जरूर बोलू शकतो, पण आत्ता ताबडतोब पंतप्रधान निधी नेमके किती पैसे हे कुणालाच माहिती नाही, लाखो कोटी रुपये आहेत, त्यात. पीएम केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्थितीवर मला दया येत आहे. कोरोनाचे उणे दुणे काढायचे नाही नाही काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार आहे. भाजपाच्या आमदार-खासदारांनी सगळे पैसे पीएम केअर फंडासाठी दिले होते, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री सहायता निधीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त केले पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रमाणे पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये, कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी. मी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून कालबद्ध पद्धतीने त्याचे वाटप करा. बँकाच्या शेतकऱ्यांना जात असलेल्या नोटिसा थांबवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.