बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 09:51 IST2023-04-21T09:48:33+5:302023-04-21T09:51:45+5:30

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत.

Uddhav Thackeray appeal Shiv Sena party workers to send rare photos videos of Balasaheb Thackeray | बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवाजी पार्क परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचा  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आढावा घेतला. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. या स्मारकासाठी बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ असतील तर ते पाठविण्यात यावेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.

अयोध्या प्रकरणी बाळासाहेबांवर केस झाली होती. त्यावेळी ते लखनौला गेले होते. त्या घटनेच्या बातम्या आणि फोटो मिळाले आहेत. इतर साहित्यही आम्ही मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवसेनाप्रमुख लखनौला गेले होते, हे काहीजणांना दाखविण्याची आवश्यकता असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Web Title: Uddhav Thackeray appeal Shiv Sena party workers to send rare photos videos of Balasaheb Thackeray