वरळीत 'सर्वोच्च' व्यवहार; ६३९ कोटींत २ फ्लॅट खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:59 IST2025-05-30T06:59:00+5:302025-05-30T06:59:08+5:30

हा देशातील आजवरचा गृहखरेदीचा सर्वोच्च व्यवहार ठरला

Two two storey flats in Worli Sea Face area sold for a whopping Rs 639 crore | वरळीत 'सर्वोच्च' व्यवहार; ६३९ कोटींत २ फ्लॅट खरेदी

वरळीत 'सर्वोच्च' व्यवहार; ६३९ कोटींत २ फ्लॅट खरेदी

मुंबई : मुंबईच्या वरळी सी फेस परिसरात दोन दुमजली फ्लॅटची विक्री तब्बल ६३९ कोटी रुपयांना झाली असून, हा देशातील आजवरचा गृहखरेदीचा सर्वोच्च व्यवहार ठरला आहे. एका औषध निर्मिती कंपनीचे अध्यक्ष असलेल्या लीना गांधी तेवारी यांनी या आलिशान घरांची खरेदी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरळी सी-फेस परिसरातील नमन-झाना या ४० मजली इमारतीमध्ये त्यांनी या दोन दुमजली फ्लॅटची खरेदी केली आहे. या इमारतीमध्ये ३२ ते ३५ मजल्यांवर त्यांचे हे फ्लॅट असून, त्यासाठी त्यांनी प्रतिचौरस फूट २ लाख ८३ हजार रुपये मोजले आहेत. या फ्लॅटचे एकत्रित आकारमान २२ हजार ५७२ चौरस फूट इतके आहे. या फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराकरिता त्यांनी ६३ कोटी ९० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि जीएसटी भरला आहे. या करांची किंमत विचारात घेता हा एकूण व्यवहार ७०३ कोटी रुपयांना झाला आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईनंतर आता वरळी परिसरात आलिशान घरांच्या विक्रीला लोक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Two two storey flats in Worli Sea Face area sold for a whopping Rs 639 crore

टॅग्स :Mumbaiमुंबई