Join us

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबास टँकरने चिरडले, दोघांचा मृत्यू 2 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 02:14 IST

अपघातामधील जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले आहे

मुंबई - विक्रोळी येथील कैलास कॉम्प्लेक्स ठिबक टू हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 4 जणांना टँकरने चिरडले. या अपघातात 2 महिलांचा जागेवरच मृत्यू झाला असून 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष जखमी झाले  आहेत. रस्त्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातला आहे.  

अपघातामधील जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले आहे. रुग्णालयात दोघांना मृत आणले. तर एक लहान मूल गंभीर अवस्थेत आणले आणल्याची माहिती  डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय यांनी दिली आहे. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :अपघातमृत्यूहॉस्पिटल