Join us

अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:46 IST

Mumbai Latest Crime News: एक हादरवून टाकणारी घटना मुंबईमध्ये घडली आहे. दोन युवकांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले. त्यांना कारमधून पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीने त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार केला. 

Mumbai Crime Updates: दोन युवक, त्यातील एक अल्पवयीन. दोघांचे शुक्रवारी म्हणजे ४ जुलै रोजी अपहरण करण्यात आले. त्यांना आमिष दाखवून कारमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर सुरू झाला बेदम मारहाण आणि छळ. मुंबईतून कारने पुण्याला नेण्यात आले. तिथून परत आणण्यात आले आणि नंतर त्यांना आरोपीने ओरल सेक्स करायला लावला. हा हादरवून टाकणारी घटना घडली आहे मुंबईत. दक्षिण मुंबईत. यामागचे कारण आहे घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून आरोपीने हे कृत्य केले. दोन युवकांच्या मारहाण, मुख मैथुन प्रकरणात चार जणांचा समावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिलीप गोस्वामी असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तीन आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

दोन युवकांचे अपहरण, प्रकरण काय?

एका अल्पवयीन मुलासह दोघांचे आरोपीने अपहरण केले. ही तेव्हा समोर आली, जेव्हा अल्पवयीन मुलाने सगळा प्रकार त्याच्या आईला सांगितला. अल्पवयीन मुलासह दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यात आली आणि तक्रार दिली. 

वाचा >>"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

मुलाने पोलिसांना सांगितले की, मुख्य आरोपी दिलीप गोस्वामीकडून दोघांनी काही पैसे घेतले होते. ते परत दे असे तो म्हणत होता. दरम्यान, ४ जुलै रोजी अल्पवयीन मुलगा त्याच्या १९ वर्षीय मित्रासोबत होता. त्यावेळी त्यांना आमिष दाखवून सोबत नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. 

कारमध्ये बसवलं आणि पुण्याला नेईपर्यंत बेदम मारलं

मुंबईत अपहरण केल्यानंतर मुख्य आरोपीसह इतर तिघांनी त्यांना एका कारमध्ये बसवलं. त्यानंतर त्यांना पुण्याला घेऊन निघाले. पुण्याला जात असताना दोन्ही युवकांना आरोपींनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुण्याला जाईपर्यंत ते मारहाण करत होते. 

पुण्याला पोहोचल्यानंतर ते कार घेऊन परत मुंबईच्या दिशेने निघाले. कारमध्ये मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी याच्यासोबत पंजूभाई गोस्वामी, धीरज आणि भारत हे देखील होते. त्या चौघांनीही दोन्ही युवकांना मारहाण केली. 

मुंबईत आल्यावर ओरल सेक्स करायला लावला

आरोपी पुण्यावरून दोन्ही युवकांना मुंबईमध्ये घेऊन आले. भुलेश्वर भागात असलेल्या दिलीप गोस्वामीच्या एका कार्यालयात त्यांना नेण्यात आले. तिथे परत त्यांना बेल्टने मारहाण करण्यात आली. त्यानंतर दिलीप गोस्वामीने त्यांना मारहाण करत त्याच्यासोबत ओरल सेक्स करायला लावले. या सगळ्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यानंतर दोन्ही युवकांना पैसे लवकर परत देण्याची हमी दिल्यानंतर सोडन देण्यात आले. 

अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि दिलीप गोस्वामी याला अटक केली. त्यानंतर तीन आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणातील दोन्ही पीडित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचे समोपदेशन सुरू करण्यात आले आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीलैंगिक शोषणलैंगिक छळमुंबई पोलीसपॉक्सो कायदा