मुंबईतील ताडदेवमधील कमला इमारतीमध्ये आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:52 AM2022-01-22T09:52:15+5:302022-01-22T13:27:30+5:30

कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती

Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building Mumbai | मुंबईतील ताडदेवमधील कमला इमारतीमध्ये आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

मुंबईतील ताडदेवमधील कमला इमारतीमध्ये आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Next

मुंबई: मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागल्याची माहिती समोर आली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. सध्या आग नियंत्रणात असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मात्र या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर असून १५ जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. तसेच मुंबईच्या महापौर आणि स्थानिक आमदारांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सहा वृद्धांना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग नियंत्रणात असली तरी धूर प्रचंड होता. सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे. 


दरम्यान, कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल ३ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 

Web Title: Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app