मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 23:13 IST2021-12-28T23:11:38+5:302021-12-28T23:13:57+5:30
अपघातातील प्रकाश बसवनाथ घोडके आणि राजमती नागेश गाडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शालन शरणाप्पा घोडके (वय ४५) या गंभीर जखमी आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
कामशेत - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीत ईरटीका गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी डॉ.अभिजीत कोगनोळे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात माहिती दिली.
या अपघातात प्रकाश बसवनाथ घोडके (वय ४८) आणि राजमती नागेश गाडेकर (वय ४३) यांचा मृत्यू झाला. तर शालन शरणप्पा घोडके( वय ४५) (सर्व.रा. मुंबई) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२८) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ईरटीका गाडीला (क्र. एमएच ४३ बीयु २५३१) ताजे गावच्या हद्दीत किलोमिटर क्रमांक ७३/१०० जवळ टायर फुटून अपघात झाला. अपघातातील प्रकाश बसवनाथ घोडके आणि राजमती नागेश गाडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शालन शरणाप्पा घोडके (वय ४५) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने करत आहेत.